प्रीपेमेंट ही एक सुविधा आहे जी तुम्हाला तुमचा लोन कालावधी पूर्ण होण्यापूर्वी तुमचे हाऊसिंग लोन (अंशत: किंवा पूर्णपणे) रिपेमेंट करण्याची अनुमती देते.
तुमच्या हाऊसिंग लोनच्या प्रीपेमेंटचा विचार करण्यापूर्वी, तुमच्याकडे वैद्यकीय अत्यावश्यकता आणि विवाह, परदेशात प्रवास इ. सारख्या तुमच्या फायनान्शियल लक्ष्यांसाठी पुरेसे फंड असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. तुम्ही अशा परिस्थितीत असणे टाळावे जेथे तुम्ही तुमचे होम लोन प्रीपेमेंट करण्यासाठी स्वत:च्या मर्यादेपेक्षा जास्त भार उचलला आहे आणि परिणामी, जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त गरज असते तेव्हा फंडची कमतरता आहे.
फ्लोटिंग रेट होम लोन्स व्यक्तींकडून कोणतेही प्री-क्लोजर/फोर-क्लोजर शुल्क आकारत नाहीत.
कॉम्बिनेशन रेट होम लोन्सच्या बाबतीत, लोनच्या फिक्स्ड कालावधीदरम्यान लोनचे प्रीपेमेंट केले असल्यास आणि असे प्रीपेमेंट व्यक्तीच्या स्वत:च्या फंडमधून नव्हे तर बॅलन्स ट्रान्सफर/रिफायनान्सच्या उद्देशाने दुसऱ्या लेंडरकडून प्राप्त झालेल्या रकमेमधून केले असल्यास लेंडरद्वारे प्रीपेमेंट शुल्क आकारले जाऊ शकते. तथापि, जर तुम्ही तुमचे हाऊसिंग लोन प्रीपेमेंट करण्यासाठी तुमचे स्वत:चे फंड वापरले तर कोणताही प्रीपेमेंट दंड आकारला जात नाही.
हाऊसिंग लोन्स सर्व्हिस देण्यास सोपे आहेत ; होम लोन्सवरील इंटरेस्ट रेट सामान्यपणे पर्सनल किंवा क्रेडिट कार्ड लोन्सवर आकारलेल्या इंटरेस्ट रेटपेक्षा कमी असतो. त्यामुळे, जर तुम्हाला लोन कमी करायचे असेल तर तुम्ही कमी इंटरेस्ट रेट असणाऱ्या हाऊसिंग लोन्सच्या तुलनेत जास्त इंटरेस्ट देणाऱ्या लोन्सचे प्रीपेमेंट प्राधान्याने करण्याचा विचार करू शकता.
तुम्ही प्रिन्सिपल रिपेमेंटवर आणि हाऊसिंग लोन्सवर भरलेल्या इंटरेस्टवर टॅक्स सवलतीचा क्लेम करण्यास पात्र आहात (निर्धारित रकमेवर आणि अटींच्या अधीन). तसेच, सरकारच्या 'सर्वांसाठी घर' यावर केंद्रित केलेल्या लक्षामुळे, हाऊसिंग लोन्सवरील टॅक्स प्रोत्साहने कालांतराने वाढू शकतात अशी अपेक्षा आहे. तुमच्या हाऊसिंग लोनच्या संपूर्ण प्रीपेमेंटवर, तुम्हाला यापुढे वरील टॅक्स लाभांचा आनंद घेता येणार नाही ; पार्ट प्रीपेमेंट्सच्या बाबतीत, तुम्हाला प्रमाणानुसार कमी टॅक्स लाभ मिळतील.