होम लोन इंटरेस्ट रेट्स

सर्व रेट्स पॉलिसी रेपो रेट अनुरुप आहेत. वर्तमान लागू रेपो रेट = 6.50%

वेतनधारी आणि स्वयं-रोजगारितांसाठी विशेष हाऊसिंग लोन रेट (व्यावसायिक आणि गैर-व्यावसायिक)
लोन स्लॅब इंटरेस्ट रेट्स (% p.a.)
सर्व लोन्स करिता* पॉलिसी रेपो रेट + 2.25% ते 3.15% = 8.75% ते 9.65%
वेतनधारी आणि स्वयं-रोजगारितांसाठी स्टँडर्ड हाऊसिंग लोन रेट्स (व्यावसायिक आणि गैर-व्यावसायिक)
लोन स्लॅब इंटरेस्ट रेट्स (% p.a.)
सर्व लोन्स करिता* पॉलिसी रेपो रेट + 2.90% ते 3.45% = 9.40% ते 9.95%

*वरील होम लोन इंटरेस्ट रेट्स / EMI एच डी एफ सी बँकेच्या ॲडजस्टेबल रेट होम लोन स्कीम (फ्लोटिंग इंटरेस्ट रेट) अंतर्गत लोन्ससाठी लागू आहेत आणि डिस्बर्समेंटच्या वेळी बदलू शकतात. वरील होम लोन इंटरेस्ट रेट्स एच डी एफ सी बँकेच्या रेपो रेटसह लिंक केलेले आहेत आणि लोनच्या कालावधीमध्ये परिवर्तनीय आहेत. सर्व लोन्स एच डी एफ सी बँकेच्या विवेकबुद्धीनुसार आहेत. वरील लोन स्लॅब आणि इंटरेस्ट रेट संबंधित अधिक तपशिलासाठी येथे क्लिक करा

 

*एचडीएफसी बँक कोणत्याही लेंडिंग सर्व्हिस प्रोव्हायडर (LSPs) कडून कोणताही होम लोन बिझनेस सोर्स करीत नाही.

होम लोन कॅल्क्युलेटर

तुमच्या लोन आणि घर खरेदी बजेटचा अंदाज घ्या आणि एच डी एफ सी बँक हाऊस लोन्स सह अगदी सहज तुमच्या घराचे स्वप्न साकार करा.

होम लोनसाठी डॉक्युमेंट्स

होम लोन मंजुरीसाठी, तुम्हाला पूर्ण भरलेल्या आणि स्वाक्षरी केलेल्या लोन ॲप्लिकेशन फॉर्मसह अर्जदार / सर्व सह-अर्जदारांसाठी खालील डॉक्युमेंट्स सादर करणे आवश्यक आहे.

होम लोन शुल्क

नॉन-हाऊसिंग शुल्क

होम लोन पात्रता

होम लोन पात्रता प्रामुख्याने उत्पन्न आणि परतफेड क्षमता यावर अवलंबून असते. इतर महत्त्वाच्या घटकांमध्ये कस्टमरचे प्रोफाईल, लोन मॅच्युरिटी वेळी वय, लोन मॅच्युरिटी वेळी प्रॉपर्टीचे वय, इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग्स रेकॉर्ड इ. समाविष्ट आहे. 

महत्त्वाचे घटक निकष
वय 18-70 वर्षे
व्यवसाय वेतनधारी / स्वयं-रोजगारित
राष्ट्रीयत्व निवासी भारतीय
कालावधी 30 वर्षांपर्यंत

स्वयं-रोजगारित व्यक्तींचे वर्गीकरण

स्वयं-रोजगारित व्यावसायिक स्वयं-रोजगारित गैर-व्यावसायिक (SENP)
डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट, कन्सल्टंट, इंजिनीअर, कंपनी सेक्रेटरी इ. व्यापारी, कमिशन एजंट, कंत्राटदार इ.

सह-अर्जदार जोडल्याने लाभ कसा होतो? *

  • कमाई करणाऱ्या सह-अर्जदारासह जास्त लोन पात्रता.

*सर्व सह-अर्जदारांना सह-मालक असण्याची आवश्यकता नाही. परंतु सर्व सह-मालकांनी लोनसाठी सह-अर्जदार असणे आवश्यक आहे. सामान्यपणे, सह-अर्जदार जवळचे कौटुंबिक सदस्य असतात.

 

कमाल फंडिंग**
₹30 लाखांपर्यंत आणि सहित लोन प्रॉपर्टी च्या किमतीच्या 90%
₹30.01 लाखांपासून ₹75 लाखांपर्यंतचे लोन प्रॉपर्टी च्या किमतीच्या 80%
₹75 लाखांपेक्षा अधिकचे लोन प्रॉपर्टी च्या किमतीच्या 75%

 

**एच डी एफ सी बँकेच्या मूल्यांकनानुसार प्रॉपर्टीचे बाजार मूल्य आणि कस्टमरच्या रिपेमेंट क्षमतेच्या अधीन.

 

विविध शहरांमध्ये होम लोनसाठी अप्लाय करा

मानपत्र

हाऊसिंग लोनसाठी नेहमी विचारले जाणारे प्रश्न

होम लोन हा सिक्युअर्ड लोनचा एक प्रकार आहे. कस्टमर घर खरेदी साठी प्राप्त करतात. प्रॉपर्टी ही विकसकाकडून बांधकाम सुरू असलेली किंवा तयार असलेली प्रॉपर्टी असू शकते, रिसेल प्रॉपर्टी खरेदी करू शकते, जमिनीच्या प्लॉटवर हाऊसिंग युनिट बांधण्यासाठी, आधीच अस्तित्वात असलेल्या घरामध्ये सुधारणा आणि विस्तार करण्यासाठी आणि दुसऱ्या फायनान्शियल संस्थेकडून घेतलेले विद्यमान लोन एचडीएफसी बँकेत ट्रान्सफर करण्यासाठी असू शकते. हाऊसिंग लोन समान मासिक हप्त्यांद्वारे (EMI) परतफेड केले जाते, ज्यामध्ये उधार घेतलेल्या मुख्य भागाचा आणि त्यावर मिळालेला व्याज असतो.

तुम्ही 4 जलद आणि सोप्या स्टेप्समध्ये एच डी एफ सी बँक होम लोन ऑनलाईन प्राप्त करू शकता:
1. साईन-अप / रजिस्टर करा
2. होम लोन ॲप्लिकेशन फॉर्म भरा
3. डॉक्युमेंट अपलोड करा
4. प्रोसेसिंग फी भरा
5. लोन मंजुरी मिळवा

तुम्ही होम लोनसाठी ऑनलाईनही अप्लाय करू शकता. भेट द्या https://portal.hdfc.com/ आता अप्लाय करण्यासाठी!.

तुम्हाला लोन रकमेवर अवलंबून एकूण प्रॉपर्टी किंमतीच्या 10-25% 'स्वत:चे योगदान' म्हणून देय करणे आवश्यक आहे. प्रॉपर्टी खर्चापैकी 75 ते 90% हाऊसिंग लोन म्हणून घेतले जाऊ शकते. कन्स्ट्रक्शन/होम इम्प्रूव्हमेंट/होम एक्सटेंशन लोन्सच्या बाबतीत, बांधकाम/सुधारणा/विस्तार अंदाजाच्या 75 ते 90% निधीपुरवठा केला जाऊ शकतो.

हाऊस लोन पात्रता व्यक्तीच्या उत्पन्न आणि रिपेमेंट क्षमतेवर अवलंबून असते. कृपया होम लोन पात्रता निकषाचा तपशील पाहा:
 

विवरण वेतनधारी व्यक्ती स्वयं-रोजगारित व्यक्ती
वय 21 वर्षांपासून 65 वर्षांपर्यंत 21 वर्षांपासून 65 वर्षांपर्यंत
किमान उत्पन्न ₹10,000 p.m. ₹2 लाख p.a.

होय. तुम्ही प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 80C, 24(b) आणि 80EEA नुसार तुमच्या होम लोनच्या मुख्य आणि इंटरेस्ट घटकांच्या रिपेमेंटवर कर लाभांसाठी पात्र असू शकता. लाभ प्रत्येक वर्षी बदलू शकतात म्हणून, कृपया नवीन माहितीसाठी तुमच्या चार्टर्ड अकाउंटंट/टॅक्स एक्स्पर्टशी संपर्क साधा.

तुम्ही घेऊ शकता तुमच्या होम लोनचे डिस्बर्समेंट एकदा प्रॉपर्टीचे तांत्रिकदृष्ट्या मूल्यांकन केल्यानंतर, सर्व कायदेशीर डॉक्युमेंटेशन पूर्ण झाले आणि तुम्ही तुमचे डाउन पेमेंट केले आहे.
 

तुम्ही तुमच्या लोन डिस्बर्समेंटसाठी ऑनलाईन किंवा आमच्या कोणत्याही ऑफिसला भेट देऊन विनंती सादर करू शकता.

होम लोनसाठी तुमची पात्रता निर्धारित करणारे काही घटक आहेत:
 

  • उत्पन्न आणि रिपेमेंट क्षमता
  • वय
  • फायनान्शियल प्रोफाईल
  • क्रेडिट रेकॉर्ड
  • क्रेडिट स्कोअर
  • विद्यमान लोन/EMI

एच डी एफ सी बँक मुख्यत्वे तुमच्या उत्पन्न आणि रिपेमेंट क्षमतेद्वारे तुमची हाऊसिंग लोन पात्रता निर्धारित करेल. इतर महत्त्वाच्या घटकांमध्ये तुमचे वय, पात्रता, अवलंबून असलेल्यांची संख्या, तुमच्या पती/पत्नीचे उत्पन्न (जर असल्यास), मालमत्ता आणि दायित्व, सेव्हिंग्स रेकॉर्ड आणि व्यवसायाची स्थिरता आणि सातत्य यांचा समावेश होतो.

जरी तुम्ही प्रॉपर्टी निवडली नसेल किंवा बांधकाम सुरू झाले नसेल तरीही, एकदा तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करण्याचा किंवा बांधण्याचा निर्णय घेतला की कोणत्याही वेळी हाऊसिंग लोनसाठी अप्लाय करू शकता. भविष्यात तुमच्या भारतात परत येण्याचे प्लॅन करण्यासाठी तुम्ही परदेशात काम करत असतानाही तुम्ही होम लोनसाठी अप्लाय करू शकता.

एका होम लोन प्रोसेस भारतात सामान्यपणे खालील टप्प्यांमधून जाते:
 

होम लोन ॲप्लिकेशन आणि डॉक्युमेंटेशन

तुम्ही एच डी एफ सी बँकेसह तुमच्या घरी बसून आरामात आणि सहजपणे होम लोनसाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन वैशिष्ट्य. वैकल्पिकरित्या, तुम्ही तुमचा संपर्क तपशील शेअर करू शकता येथे आमच्या लोन एक्स्पर्टसाठी तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि तुमचे लोन ॲप्लिकेशन पुढे नेण्यासाठी.

तुमच्या होम लोन ॲप्लिकेशन फॉर्मसह सबमिट करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंटेशन उपलब्ध आहे येथे.ही लिंक तुमच्या लोन ॲप्लिकेशनच्या प्रोसेसिंगसाठी आवश्यक KYC, उत्पन्न आणि प्रॉपर्टी संबंधित डॉक्युमेंट्सची तपशीलवार चेकलिस्ट प्रदान करते. चेकलिस्ट सूचक आहे आणि होम लोन मंजुरी प्रोसेस दरम्यान अतिरिक्त डॉक्युमेंटची विचारणा केली जाऊ शकते.
 

होम लोनची मंजुरी आणि डिस्बर्समेंट

मंजुरी प्रोसेस: वर नमूद केलेल्या चेकलिस्ट नुसार सादर केलेल्या डॉक्युमेंट्सच्या आधारावर होम लोनचे मूल्यांकन केले जाते आणि मंजूर रक्कम कस्टमरला कळविली जाते. अप्लाय केलेली हाऊसिंग लोन रक्कम आणि मंजूर रक्कम मध्ये फरक असू शकतो. हाऊसिंग लोनच्या मंजुरीनंतर, मंजुरी पत्र लोन रक्कम, कालावधी, लागू इंटरेस्ट रेट, रिपेमेंट पद्धत आणि अर्जदारांना पूर्ण करण्यासाठी आवश्यक इतर विशेष अटींचा तपशील जारी केला जातो.

डिस्बर्समेंट प्रोसेस: हाऊसिंग लोन डिस्बर्समेंट प्रोसेस एच डी एफ सी बँकेकडे मूळ प्रॉपर्टी संबंधित डॉक्युमेंट्स सबमिट करण्यासह सुरू होते. जर प्रॉपर्टी निर्माणाधीन प्रॉपर्टी असेल तर डेव्हलपरने प्रदान केलेल्या कन्स्ट्रक्शन लिंक्ड पेमेंट प्लॅननुसार ट्रांच मध्ये डिस्बर्समेंट केले जाते. कन्स्ट्रक्शन/होम इम्प्रूव्हमेंट/होम एक्सटेंशन लोन्सच्या बाबतीत, प्रदान केलेल्या अंदाजानुसार बांधकाम/सुधारणेच्या प्रगतीनुसार डिस्बर्समेंट केले जाते. दुसऱ्या विक्री / पुनर्विक्री प्रॉपर्टीसाठी विक्री कराराच्या अंमलबजावणीच्या वेळी संपूर्ण लोनची रक्कम वितरित केली जाते.
 

होम लोनचे रिपेमेंट

होम लोनचे रिपेमेंट समान मासिक हप्ते (EMI) द्वारे केले जाते, जे इंटरेस्ट आणि मुख्य रकमेचे कॉम्बिनेशन आहे. पुनर्विक्री घरांसाठी लोनच्या बाबतीत, लोनचे डिस्बर्समेंट झालेल्या महिन्यानंतर EMI सुरू होते. बांधकाम अंतर्गत असलेल्या प्रॉपर्टी साठी लोनच्या बाबतीत, सामान्यत: एकदा बांधकाम पूर्ण झाल्यावर आणि हाऊस लोन पूर्णपणे वितरित झाले की EMI सुरू होते. तथापि ग्राहक लवकरच त्यांची EMI सुरू करण्याची निवड करू शकतात. बांधकामाच्या प्रगतीनुसार केलेल्या प्रत्येक आंशिक डिस्बर्समेंट सह EMI प्रमाणात वाढ होईल.

खालील होम लोनचे प्रकार प्रॉडक्ट्स सामान्यपणे भारतात याद्वारे ऑफर केले जातात हाऊसिंग फायनान्स संस्था:
 

होम लोन्स

हे लोन यासाठी घेतले जातात:

1 मंजूर प्रोजेक्टमध्ये खासगी डेव्हलपर्सकडून फ्लॅट, रो हाउस, बंगल्याची खरेदी;

2.DDA, म्हाडा तसेच विद्यमान सहकारी हाऊसिंग संस्था, अपार्टमेंट मालकांचे असोसिएशन किंवा विकास प्राधिकरणांच्या वसाहती किंवा खासगीरित्या बांधकाम केलेली घरे अशा प्रॉपर्टी खरेदीसाठी लोन्स

3. फ्रीहोल्ड / लीज होल्ड प्लॉट किंवा डेव्हलपमेंट ऑथोरिटी द्वारे वाटप केलेल्या प्लॉटवरील बांधकामासाठी लोन
 

प्लॉट खरेदी लोन

प्लॉट खरेदी लोन थेट वाटप किंवा दुसऱ्या विक्री व्यवहाराद्वारे तसेच अन्य बँक / फायनान्शियल संस्थेकडून घेतलेले तुमचे विद्यमान प्लॉट खरेदी लोन ट्रान्सफर करण्यासाठी प्लॉट खरेदी करण्यासाठी घेतले जाते.
 

बॅलन्स ट्रान्सफर लोन

अन्य बँक / फायनान्शियल संस्थेकडून घेतलेले तुमचे थकित होम लोन एच डी एफ सी बँकेकडे ट्रान्सफर करणे म्हणून ओळखले जाते बॅलन्स ट्रान्सफर लोन.
 

हाऊस रिनोव्हेशन लोन्स

हाऊस रिनोव्हेशन लोन टायलिंग, फ्लोअरिंग, अंतर्गत / बाह्य प्लास्टर आणि पेंटिंग इ. सारख्या अनेक मार्गांनी तुमच्या घराचे रिनोव्हेशन (स्ट्रक्चर / कार्पेट एरिया बदलल्याशिवाय) करण्यासाठी लोन आहे.
 

होम एक्सटेंशन लोन

होम एक्सटेंशन लोन तुम्हाला अतिरिक्त रुम आणि फ्लोअर इ. सारख्या बाबींसह तुमचे घर विस्तारित करण्यात किंवा जागा जोडण्यास मदत करते.

होय.. तुम्ही एकाच वेळी दोन होम लोन प्राप्त करू शकता. तथापि, तुमच्या लोनची मंजुरी तुमच्या रिपेमेंट क्षमतेवर अवलंबून असते. तुमची पात्रता आणि दोन होम लोनसाठी EMI परतफेड करण्याची क्षमता याचे मूल्यांकन करणे एच डी एफ सी बँकेच्या निर्णयावर आहे.

तुमच्या सोयीसाठी, एच डी एफ सी बँक तुमच्या हाऊस लोनच्या रिपेमेंटसाठी विविध पद्धती ऑफर करते. तुम्ही ECS (इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीम) द्वारे हप्ते भरण्यासाठी तुमच्या बँकरला स्थायी निर्देश जारी करू शकता, तुमच्या नियोक्त्याद्वारे मासिक हप्त्यांची थेट कपात निवडू शकता किंवा तुमच्या सॅलरी अकाउंटमधून पोस्ट-डेटेड चेक जारी करू शकता.

कमाल रिपेमेंट कालावधी तुम्ही घेत असलेल्या हाऊसिंग लोनच्या प्रकारावर, तुमचे प्रोफाईल, वय, लोन मॅच्युरिटी इ. वर अवलंबून असते.

होम लोन आणि बॅलन्स ट्रान्सफर लोनसाठी, कमाल कालावधी 30 वर्ष किंवा निवृत्तीचे वय होईपर्यंत, जे कमी असेल ते.

होम एक्सटेंशन लोनसाठी, कमाल कालावधी 20 वर्ष किंवा निवृत्तीचे वय होईपर्यंत, जे कमी असेल ते.

होम रिनोव्हेशन आणि टॉप-अप लोनसाठी, कमाल कालावधी 15 वर्ष किंवा निवृत्तीचे वय होईपर्यंत, जे कमी असेल ते.

लोन डिस्बर्समेंट झालेल्या महिन्यानंतरच्या महिन्यापासून EMI सुरू होते. अंडर-कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी लोनसाठी EMI सामान्यपणे संपूर्ण होम लोन डिस्बर्समेंट झाल्यानंतर सुरू होते परंतु कस्टमर त्यांचे पहिले डिस्बर्समेंट मिळाल्यानंतर त्यांचे EMI सुरू करू शकतात आणि प्रत्येक नंतरच्या डिस्बर्समेंटच्या प्रमाणात त्यांचे EMI वाढेल. रि-सेल प्रकरणांसाठी, संपूर्ण लोन रक्कम एकाच वेळी वितरित केल्याने, संपूर्ण लोन रकमेवर EMI डिस्बर्समेंटच्या महिन्यानंतर सुरू होते

प्री-EMI हा तुमच्या हाऊसिंग लोन वरील इंटरेस्टचे मासिक पेमेंट आहे. लोनचे पूर्ण डिस्बर्समेंट होईपर्यंत ही रक्कम कालावधीदरम्यान भरली जाते. तुमचा वास्तविक लोन कालावधी - आणि EMI (मुख्य आणि इंटरेस्ट दोन्ही समाविष्ट) पेमेंट — प्री-EMI फेज संपल्यानंतर म्हणजेच हाऊस लोन पूर्णपणे डिस्बर्समेंट झाल्यानंतर सुरू होतो.

प्रॉपर्टीचे सर्व सह-मालक हाऊस लोनमध्ये सह-अर्जदार असणे आवश्यक आहे. सामान्यपणे, सह-अर्जदार जवळच्या कुटुंबातील सदस्य असतात.

तुमचे हाऊसिंग लोन इंटरेस्ट रेट तुम्ही निवडलेल्या लोन प्रकारावर अवलंबून असते. दोन प्रकारचे लोन आहेत:
 

ॲडजस्टेबल रेट किंवा फ्लोटिंग रेट

ॲडजस्टेबल किंवा फ्लोटिंग रेट लोनमध्ये, तुमच्या लोनवरील इंटरेस्ट रेट तुमच्या लेंडरच्या बेंचमार्क रेटसह लिंक केले आहे. बेंचमार्क रेटमधील कोणताही बदल तुमच्या लागू असलेल्या इंटरेस्ट रेटमध्ये सप्रमाण बदल घडवून आणेल. इंटरेस्ट रेट्स निश्चित कालावधी नंतर रिसेट केले जातात. अशाप्रकारचे रिसेट फायनान्शियल कॅलेंडर नुसार असू शकतात किंवा डिस्बर्समेंटच्या पहिल्या तारखेनुसार प्रत्येक कस्टमरसाठी युनिक असू शकतात. एच डी एफ सी बँक लोन कराराच्या अंमलबजावणी दरम्यान कोणत्याही क्षणी आपल्या स्वत:च्या विवेकबुद्धीनुसार संभाव्य आधारावर इंटरेस्ट रेट रिसेट सायकल बदलू शकते.
 

कॉम्बिनेशन लोन्स

कॉम्बिनेशन लोन हे अंशत: फिक्स्ड आणि अंशत: फ्लोटिंग असतात. फिक्स्ड रेट कालावधी नंतर, लोन ॲडजस्टेबल रेट मध्ये स्विच होतात.

होय. तुम्ही तुमचा वास्तविक लोन कालावधी पूर्ण होण्यापूर्वी तुमचे होम लोन प्रीपे करू शकता (अंशत: किंवा पूर्ण). कृपया लक्षात घ्या की बिझनेसच्या उद्देशाने त्याचा लाभ घेतल्याशिवाय फ्लोटिंग रेट होम लोनवर कोणतेही प्रीपेमेंट शुल्क नाही.

नाही. तुमच्या होम लोनसाठी तुमच्याकडे हमीदार असण्याची गरज नाही. तुम्हाला केवळ विशिष्ट परिस्थितीत हमीदाराची मागणी केली जाईल, म्हणजेच:
 

  • जेव्हा प्राथमिक अर्जदाराकडे कमकुवत फायनान्शियल स्थिती असते
  • जेव्हा अर्जदाराला त्यांच्या पात्रतेच्या पलीकडे असलेली रक्कम उधार घ्यायची असते.
  • जेव्हा अर्जदार प्रस्थापित किमान उत्पन्न निकषापेक्षा कमी कमवतो.

नाही. हाऊसिंग लोन इन्श्युरन्स अनिवार्य नाही. तथापि, तुम्हाला कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीपासून संरक्षणासाठी इन्श्युरन्स खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो.

हाऊसिंग लोन तात्पुरते सर्टिफिकेट हे इंटरेस्टचा सारांश आहे आणि फायनान्शियल वर्षादरम्यान तुमच्या लोन साठी तुम्ही रिपेड केलेली मुख्य रक्कम आहे. हे तुम्हाला एच डी एफ सी बँकेद्वारे प्रदान केले जाते आणि कर कपातीचा क्लेम करण्यासाठी आवश्यक आहे. जर तुम्ही विद्यमान कस्टमर असाल तर तुम्ही सहजपणे तुमचे तात्पुरते होम लोन तात्पुरते सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता आमच्या ऑनलाईन पोर्टल .

आमचे एच डी एफ सी बँक रीच लोन्स सूक्ष्म-उद्योजक आणि वेतनधारी व्यक्तींसाठी घर खरेदी करणे शक्य करते ज्यांच्याकडे उत्पन्नाच्या डॉक्युमेंटेशनचा पुरेसा पुरावा असू शकतो किंवा नसूही शकतो. तुम्ही एच डी एफ सी बँक रीच सह किमान उत्पन्न डॉक्युमेंटेशन सह हाऊस लोनसाठी अप्लाय करू शकता.

निर्माणाधीन असलेल्या प्रॉपर्टी करता बांधकामाच्या प्रगतीच्या आधारावर एच डी एफ सी बँक लोन चे वाटप हप्त्यांमध्ये करते. वितरित केलेला प्रत्येक हप्ता 'आंशिक' किंवा 'त्यानंतरचे' डिस्बर्समेंट म्हणून ओळखले जाते.

तुम्ही प्री-ॲप्रूव्ह्ड होम लोनसाठी अप्लाय करू शकता जे तुमचे उत्पन्न, पत व फायनान्शियल स्थितीच्या आधारावर दिलेल्या लोनसाठी इन-प्रिन्सिपल मंजुरी आहे. सामान्यपणे, प्रॉपर्टी निवडण्यापूर्वी प्री-ॲप्रूव्ह्ड लोन घेतले जातात आणि लोन मंजुरीच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या कालावधीसाठी वैध असतात.

एच डी एफ सी बँकेकडून हाऊसिंग लोन मिळवणे सोपे आहे आणि त्यामध्ये स्थिर उत्पन्न, चांगले क्रेडिट स्कोअर आणि वाजवी डेब्ट-टू-इन्कम रेशिओ यासारख्या काही निकषांची पूर्तता करणे समाविष्ट आहे. लोन रक्कम क्रेडिट पात्रता आणि इतर बँक धोरणांसारख्या घटकांद्वारे निर्धारित केली जाते. आवश्यक डॉक्युमेंट्समध्ये उत्पन्नाचा पुरावा, KYC, रोजगार पडताळणी आणि मालमत्ता आणि कर्जाविषयी तपशील समाविष्ट आहेत. मंजुरी संधी वाढविण्यासाठी, निरोगी क्रेडिट स्कोअर राखण्याचा, डाउन पेमेंटसाठी सेव्ह करण्याचा आणि थकित कर्ज कमी करण्याचा सल्ला दिला जातो. फिक्स्ड-रेट, ॲडजस्टेबल-रेट इत्यादींसह विविध लोन प्रकार विविध गरजा पूर्ण करतात, ज्यामुळे कर्जदारांना त्यांच्या आर्थिक परिस्थिती आणि प्राधान्यांसह सर्वोत्तम सूट होणार पर्याय निवडण्याची अनुमती मिळते.

कस्टमरला ऑफर केलेले रेट्स (मागील तिमाही)
भाग आयआरआर एप्रिल
किमा कमाल सरासरी. किमा कमाल सरासरी.
गृहनिर्माण 8.35 12.50 8.77 8.35 12.50 8.77
नॉन-हाऊसिंग* 8.40 13.30 9.85 8.40 13.30 9.85
*नॉन-हाऊसिंग = LAP(इक्विटी), नॉन-रेसिडेन्शियल प्रीमायसेस लोन आणि इन्श्युरन्स प्रीमियम फंडिंग  

होम लोन लाभ

एंड टू एंड डिजिटल प्रोसेस

4 सोप्या स्टेप्समध्ये होम लोन मंजुरी.

कस्टमाईज्ड रिपेमेंट पर्याय

तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विशेष होम लोन.

सुलभ डॉक्युमेंटेशन

किमान डॉक्युमेंट्स सह अप्लाय करा, वेळ आणि प्रयत्न वाचवा.

24x7 सहाय्य

चॅट, व्हॉट्सॲप वर कधीही, कुठेही आमच्याशी संपर्क साधा

ऑनलाईन लोन अकाउंट

तुमचे लोन सहजपणे मॅनेज करण्यासाठी तुमच्या अकाउंटमध्ये लॉग-इन करा.

होम लोनची प्रमुख वैशिष्ट्ये

मंजूर प्रोजेक्टमध्ये खासगी डेव्हलपर्सकडून फ्लॅट, रो हाउस, बंगला खरेदीसाठी होम लोन.

DDA, MHADA इत्यादी डेव्हलपमेंट ऑथोरिटी कडून प्रॉपर्टी खरेदीसाठी होम लोन.

विद्यमान को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी किंवा अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन किंवा डेव्हलपमेंट ऑथोरिटी सेटलमेंट्स किंवा खासगीरित्या तयार केलेल्या घरांमध्ये प्रॉपर्टी खरेदीसाठी लोन.

फ्रीहोल्ड / लीज होल्ड प्लॉट किंवा डेव्हलपमेंट ऑथोरिटी द्वारे वाटप केलेल्या प्लॉटवरील बांधकामासाठी लोन.

योग्य घर खरेदी निर्णय घेण्यात तुमची मदत करण्यासाठी तज्ज्ञ कायदेशीर आणि तांत्रिक सल्लामसलत.

भारतात कुठेही होम लोन मिळविण्यासाठी आणि सर्व्हिस देण्यासाठी एकीकृत होम फायनान्स शाखांचे नेटवर्क.

भारतीय लष्करात कार्यरत असलेल्यांसाठी होम लोनसाठी AGIF सह विशेष व्यवस्था. अधिक जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा

हाऊसिंग लोन रिपेमेंट पर्याय

स्टेप-अप रिपेमेंट फॅसिलिटी (SURF)*

SURF एक पर्याय ऑफर करते जिथे रिपेमेंट शेड्यूल तुमच्या अपेक्षित उत्पन्न वाढीशी जोडलेले असते. प्रारंभिक वर्षांमध्ये तुम्ही अधिक लोनचा लाभ घेऊ शकता आणि कमी EMI भरू शकता. त्यानंतर, तुमच्या उत्पन्नातील गृहीत वाढी सह रिपेमेंट वाढत जाते.

फ्लेक्सिबल लोन इंस्टॉलमेंट्स प्लॅन (FLIP)*

FLIP तुमच्या रिपेमेंट क्षमतेस अनुरुप एक कस्टमाईज्ड उपाय ऑफर करते जो लोनच्या मुदतीत बदलू शकतो. लोनची रचना अशा प्रकारे केली जाते की सुरुवातीच्या काळामध्ये EMI जास्त असते आणि नंतर उत्पन्नाच्या प्रमाणात ते घटते. 

ट्रांच आधारित EMI

जर तुम्ही निर्माणाधीन प्रॉपर्टी खरेदी केली असेल तर तुम्हाला सामान्यतः लोनच्या अंतिम डिस्बर्समेंट पर्यंत काढलेल्या लोनच्या रकमेवर आधी इंटरेस्ट सर्व्हिस करावा लागतो आणि त्यानंतर EMI भरावे लागते. जर तुम्हाला त्वरित मुख्य रिपेमेंट सुरू करायचे असेल तर तुम्ही लोन ट्रांच करण्याचा पर्याय निवडू शकता आणि वितरित केलेल्या संचयी रकमेवर EMI भरणे सुरू करू शकता.

ॲक्सिलरेटेड रिपेमेंट स्कीम

हा पर्याय तुम्हाला तुमच्या उत्पन्नातील वाढीच्या प्रमाणात दरवर्षी EMI वाढवण्याची सुविधा प्रदान करतो ज्यामुळे तुम्हाला लोन रिपेमेंट जलद करता येते.


*केवळ वेतनधारी व्यक्तींसाठी लागू.

होम लोन ॲप्लिकेशन प्रोसेस

होम लोनसाठी अप्लाय कसे करावे याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस

स्टेप 1

ऑनलाईन होम लोन प्रदात्याच्या वेबसाईटला भेट द्या – https://www.hdfc.com

स्टेप 2

'होम लोनसाठी अप्लाय करा' वर क्लिक करा'

स्टेप 3

तुमची पात्र होम लोन रक्कम शोधण्यासाठी, 'पात्रता तपासा' वर क्लिक करा’. 

स्टेप 4

'मूलभूत माहिती' टॅब अंतर्गत, तुम्ही शोधत असलेल्या हाऊसिंग लोनचा (होम लोन, हाऊस रिनोव्हेशन लोन, प्लॉट लोन इ.) प्रकार निवडा. अधिक माहितीसाठी तुम्ही लोन प्रकाराच्या बाजूच्या लिंकवर क्लिक करू शकता.

स्टेप 5

जर तुम्ही प्रॉपर्टी शॉर्टलिस्ट केली असेल तर पुढील प्रश्नात 'होय' वर क्लिक करा आणि प्रॉपर्टी तपशील (राज्य, शहर आणि मालमत्तेची अंदाजित किंमत) प्रदान करा; जर तुम्ही अद्याप प्रॉपर्टीवर ठरवले नसेल तर 'नाही' निवडा’. 'अर्जदाराचे नाव' क्षेत्रात तुमचे नाव लिहा’. जर तुम्हाला तुमच्या होम लोन ॲप्लिकेशनमध्ये सह-अर्जदार जोडायचा असेल तर सह-अर्जदारांची संख्या निवडा (तुमच्याकडे कमाल 8 सह-अर्जदार असू शकतात).

स्टेप 6

‘अर्जदार’ टॅब अंतर्गत, तुमचे निवासी स्टेटस (भारतीय/ NRI) निवडा, तुम्ही सध्या राहत असलेले राज्य व शहराचे नाव द्या, तुमचे लिंग, वय, व्यवसाय, निवृत्तीचे वय, ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक, निव्वळ/एकूण मासिक उत्पन्न आणि सर्व अस्तित्वातील थकीत लोन्ससाठी प्रत्येक महिन्याला भरलेला EMI असा तपशील द्या.

स्टेप 7

त्यानंतर तुम्हाला 'ऑफर्स' टॅबवर निर्देशित केले जाईल जिथे तुम्ही घेऊ शकता असे होम लोन प्रॉडक्ट्स, तुम्ही पात्र असलेली कमाल लोन रक्कम, देय EMI आणि लोन कालावधी, इंटरेस्ट रेट आणि इंटरेस्ट फिक्स्ड आहे की फ्लोटिंग याबाबतची माहिती पाहू शकता.

स्टेप 8

तुम्हाला अप्लाय करावयाचे लोन प्रॉडक्ट निवडा. तुम्हाला होम लोन ॲप्लिकेशन फॉर्मवर निर्देशित केले जाईल जिथे तुम्ही आधीच दिलेला तपशील (जसे की तुमचे नाव, ईमेल आयडी इ.) आधीच भरले जाईल. बॅलन्स तपशील भरा - जसे की तुमची जन्मतारीख आणि पासवर्ड आणि 'सादर करा' वर क्लिक करा’.

स्टेप 9

त्यानंतर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करणे आवश्यक आहे.    

स्टेप 10

आता तुम्हाला केवळ प्रोसेसिंग फी भरावी लागेल आणि तुमचे ऑनलाईन हाऊसिंग लोन ॲप्लिकेशन पूर्ण होईल.

एच डी एफ सी बँक कडे होम लोनसाठी अप्लाय का करावे

एच डी एफ सी बँक ही भारतातील अग्रगण्य खासगी बँकांपैकी एक आहे आणि 1994 मध्ये खासगी क्षेत्रातील बँक स्थापित करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून मंजुरी प्राप्त करणाऱ्या पहिल्या बँकांपैकी एक आहे.

मार्च 31, 2023 पर्यंत, बँकेकडे 3,811 शहरे / नगरांमध्ये 7,821 शाखा आणि 19,727 ATMs / कॅश डिपॉझिट आणि विद्ड्रॉल मशिन्स(CDMs) चे राष्ट्रव्यापी वितरण नेटवर्क होते. एच डी एफ सी बँकेचे एंड-टू-एंड डिजिटल होम लोन ॲप्लिकेशन प्रोसेस, संपूर्ण देशभरात एकीकृत होम लोन शाखा नेटवर्क आणि 24X7 ऑनलाईन सहाय्य तुमच्या घराच्या मालकीचा प्रवास अविस्मरणीय बनवू शकते.

तुम्ही आता होम लोनसाठी ऑनलाईन अप्लाय करा एच डी एफ सी बँकेच्या जलद आणि सुलभ अप्‍लाय ऑनलाईन मॉड्यूलसह 4 सोप्या स्टेप्समध्ये.

होम लोनसाठी अप्लाय करण्यापूर्वी तपासण्याच्या/करावयाच्या गोष्टी

खालील मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे होम लोनसाठी अप्लाय करण्यापूर्वी

  • तुमचे होम लोन ॲप्लिकेशन सुरू करण्यापूर्वी तुमची लोन पात्रता तपासा
  • तुमची लोन ॲप्लिकेशन प्रोसेस सुरू करण्यापूर्वी FAQs वाचा.
  • आवश्यक डॉक्युमेंट्सची यादी पाहा आणि तुमची होम लोन ॲप्लिकेशन प्रोसेस सुरू करण्यापूर्वी त्यांना तयार ठेवा
  • तुम्ही होम लोन प्रदात्याला तुमच्या ॲप्लिकेशनवर प्रोसेस करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व तपशील प्रदान केल्याची खात्री करा.
  • तुम्हाला हवे असलेल्या होम लोन प्रकाराबद्दल (होम लोन, हाऊस रिनोव्हेशन लोन, प्लॉट लोन इ.) स्पष्ट राहा

होम लोन घेण्याचे फायदे

1. हे तुम्हाला घर खरेदीसाठी फंड प्राप्त करण्यास मदत करते

घर खरेदीसाठी पुरेसा फंड जमा करण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. तथापि, तुम्हाला यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी फक्त होम लोन घेऊ शकता.

2. यामध्ये कर लाभ मिळतात

इंटरेस्ट आणि मुख्य रिपेमेंटवर होम लोन प्राप्तिकर लाभ ऑफर करते तुम्ही सेक्शन 80C अंतर्गत मूळ रिपेमेंटवर आणि सेक्शन 24B अंतर्गत इंटरेस्ट रिपेमेंटवर कर कपात क्लेम करू शकता.

3. कमी इंटरेस्ट रेट्स

होम लोनवरील इंटरेस्ट रेट्स अन्य प्रकारच्या लोनपेक्षा कमी आहेत. आजकाल हाऊसिंग लोन घेणे खूपच परवडणारे झाले आहे.

4. कस्टमाईज्ड रिपेमेंट पर्याय

होम लोन प्रदाता तुमच्या आवश्यकतेनुसार तुमचे होम लोन रिपेमेंट तयार करतात.

होम लोन मिळविण्याच्या शक्यतेत मी कशाप्रकारे वाढ करू?

  • वेळेवर रिपेमेंटचे योग्य ट्रॅक रेकॉर्ड तयार करून तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारा जेणेकरून तुम्ही उच्च क्रेडिट स्कोअर प्राप्त करू शकता जे होम लोन मिळविण्याच्या तुमच्या संभावना सुधारेल.
  • वारंवार नोकरी बदलणे टाळा कारण यामुळे अस्थिरता असल्याचे दिसून येते.
  • तुमचा क्रेडिट रिपोर्ट नियमितपणे प्राप्त करा, वर्षातून एकदा किंवा दोनदा त्यास त्रुटीसाठी पडताळा आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा त्यांना सुधारित करा.
  • तुम्ही शॉर्टलिस्ट केलेली प्रॉपर्टी हाऊसिंग लोनसाठी विचारात घेतली जाईल का ते लेंडरकडे तपासा. त्याचवेळी, स्वतंत्र योग्य तपासणी करा.
  • तुमच्या होम लोन ॲप्लिकेशन चे डॉक्युमेंटेशन लेंडरच्या आवश्यकतेनुसार असल्याची खात्री करा.
  • होम लोन प्राप्त करण्याच्या तुमच्या संधी सुधारण्यासाठी तुम्ही खालील पावले उचलू शकता

होम लोनसाठी अप्लाय करताना काय करावे आणि काय करू नये

  • तुमचे होम लोन ॲप्लिकेशन सुरू करण्यापूर्वी तुमची हाऊसिंग लोन पात्रता तपासा.
  • आवश्यक डॉक्युमेंट्सची यादी पाहा आणि तुमची ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस सुरू करण्यापूर्वी ते तयार ठेवा
  • तुम्हाला हवे असलेल्या लोन प्रकाराबद्दल (होम लोन, हाऊस रिनोव्हेशन लोन, प्लॉट लोन इ.) स्पष्ट राहा
  • तुमची लोन ॲप्लिकेशन प्रोसेस सुरू करण्यापूर्वी FAQ वाचा
  • तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही ऑनलाईन चॅट सुविधा वापरू शकता.
  • तुमच्या ॲप्लिकेशनवर प्रोसेस करण्यासाठी होम लोन प्रदात्याला आवश्यक असलेले सर्व तपशील प्रदान केल्याची खात्री करा.

  • तुमची पात्रता तपासण्याशिवाय तात्कालिक लोन रकमेकरिता ॲप्लिकेशन करणे टाळा
  • महत्त्वाचे डॉक्युमेंट सादर न करणे टाळा. 
  • तुमचे लोन ॲप्लिकेशन करताना तुमचा CIBIL स्कोअर दुर्लक्षित करू नका (तुमच्या लोन ॲप्लिकेशनवर तुमच्या स्कोअरचा प्रभाव पडतो)

एच डी एफ सी बँक होम लोन अटी व शर्ती

सिक्युरिटी

लोनची सिक्युरिटी सामान्यतः फायनान्स केल्या जात असलेल्या प्रॉपर्टी आणि / किंवा एच डी एफ सी बँकेला आवश्यक असलेल्या इतर कोणत्याही कोलॅटरल / अंतरिम सिक्युरिटी वरील सिक्युरिटी इंटरेस्ट असेल.

इतर शर्ती

उपरोक्त सर्व माहिती जागरुकता आणि कस्टमरच्या सोयीसाठी आहे आणि याचा हेतू केवळ एच डी एफ सी बँकेच्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस बद्दल सूचक मार्गदर्शक म्हणून कार्य करण्याचा आहे. एच डी एफ सी बँकेच्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस बद्दल तपशीलवार माहितीसाठी कृपया जवळच्या एच डी एफ सी बँक शाखेला भेट द्या.

येथे क्लिक करा तुमच्या लोनशी संबंधित महत्त्वपूर्ण अटी व शर्तींसाठी.

कृपया आमच्या लोन एक्स्पर्ट कडून कॉल मिळवण्यासाठी तुमचे तपशील शेअर करा!

Thank you!

धन्यवाद!

आमचे लोन एक्स्पर्ट लवकरच तुम्हाला कॉल करतील!

ओके

काहीतरी चुकीचे घडले आहे!

कृपया पुन्हा एन्टर करा

ओके

काय मग, होम लोन घ्यायचा विचार करताय का?

फक्त एक मिस्ड कॉल द्या या क्रमांकावर

Phone icon

+91-9289200017

जलद पेमेंट करा

लोन कालावधी

15 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

अधिक लोकप्रिय

लोन कालावधी

20 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

आरामात

लोन कालावधी

30 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

800 आणि त्यावरील क्रेडिट स्कोअरसाठी*

* हे रेट आजनुसार आहेत,

तुमच्यासाठी काय योग्य आहे याबाबत साशंक आहात का?

Banner
"एच डी एफ सी हाऊसिंग फायनान्सची त्वरित सेवा आणि समजूतदारपणाचे कौतुक करा"
- अविनाशकुमार राजपुरोहित, मुंबई

तुमचे तपशील शेअर केल्याबद्दल धन्यवाद

198341
198341
198341
198341
अमॉर्टिझेशन शेड्यूल पाहा

EMI ब्रेक-डाउन चार्ट