घर खरेदी करणे हा आयुष्यातील सर्वात मोठा आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे. कुटुंबाच्या सर्वांगीण कल्याणासाठी चांगले घर आवश्यक आहे. त्यामुळे त्याच्या खरेदीसाठी सावधगिरीने नियोजन आणि काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. तुमच्या आवश्यकतेचे मूल्यांकन करा आणि सर्वात योग्य हाऊसिंग लोन साठी अप्लाय करा. 

विविध प्रकारच्या कंझ्युमरसाठी त्यांच्या विविध गरजांचा विचार करून एच डी एफ सी बँक हाऊसिंग लोनची विस्तृत श्रेणी देऊ करते. आमच्या विविधतापूर्ण असलेल्या लोन प्रकारांत डेव्हलपर किंवा डेव्हलपमेंट ऑथोरिटी कडून नवीन अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी आणि रिसेल प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी लागणारे लोन याचा समावेश होतो.

... अधिक वाचा

जर तुम्हाला तुमचे स्वतःचे घर बांधायचे असेल तर तुम्ही प्लॉट खरेदीसाठी आणि त्यानंतर बांधकामासाठी लोन प्राप्त करू शकता.

होम इम्प्रुव्हमेंट लोनमुळे घराचे नूतनीकरण सुलभ होते आणि तुमच्या सध्याच्या घरात अधिकाधिक मजले किंवा रुम जोडण्यासाठी लागणार्‍या खर्चासाठी तुम्हाला होम एक्सटेंशन लोन मिळू शकेल.

एक वर्षाचे लोन रिपेमेंट पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही अतिरिक्त फंड्स करिता टॉप-अप लोनसाठी अप्लाय करू शकता जे तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरता येऊ शकतात.

आम्ही शेतकरी, वनस्पतींची लागवड करणारे, बागकाम करणारे यांच्यासाठी त्यांना ग्रामीण व शहरी भागात निवासी प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी, घराचे बांधकाम करण्यासाठी आणि त्यांच्या सध्याच्या घराची सुधारणा किंवा विस्तार करण्यासाठी रुरल हाऊसिंग लोनही देऊ करतो.

आणखी एक विशेष प्रॉडक्ट म्हणजे एच डी एफ सी बँक रीच होम लोन जे खासकरून असंघटीत क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींसाठी डिझाईन केले आहे. आमची अद्वितीय मूल्यांकन पद्धत या क्षेत्रातील व्यक्तींसाठी स्वतःचे घर मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

पहिल्यांदा घर घेणार्‍या व्यक्तीस प्रधान मंत्री आवास योजना क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम चा लाभ मिळू शकतो आणि तुमच्या होम लोन रकमेवर ₹2.67 लाख पर्यंत सबसिडी मिळू शकते.

जर तुमच्याकडे असेल विद्यमान होम लोन, तुम्ही एच डी एफ सी बँकमध्ये बॅलन्स ट्रान्सफर निवडू शकता आणि याचा लाभ घेऊ शकता कमी होम लोन इंटरेस्ट रेट्स, चांगल्या रिपेमेंट अटी आणि वर्धित सेवा.

तुम्ही आमच्या वेबसाईटवरील ‘ऑनलाईन अप्लाय करा’ या फीचरमार्फत तुमच्या सोयीनुसार, कधीही, कुठेही असताना लोनसाठी अप्लाय करू शकता. आमची ऑनलाईन होम लोन ॲप्लिकेशन ही 3-स्टेप प्रोसेस आहे ज्यात सुलभ डॉक्युमेंट अपलोड, फीचे ऑनलाईन पेमेंट आणि जलद होम लोन मंजुरी यांचा समावेश होतो. कमी वाचा