होम लोन EMI कॅल्क्युलेटर

₹1 लाख ₹10 कोटी
1 30
%
0.5 15
198341
तपशील पाहा
198341
198341
198341

सामान्यत: ही कॅल्क्युलेटर केवळ स्वत:ची मदत व्हावी या हेतूने निर्माण केली आहेत. याचे परिणाम तुम्ही पुरविलेल्या गृहितकांसह अन्य काही घटकांवर अवलंबून असतात. आम्ही त्याची अचूकता किंवा तुमच्या परिस्थितीसाठी उपयुक्तता याची हमी देत नाही.
NRIs ने निव्वळ उत्पन्न एन्टर केले पाहिजे.

होम लोन EMI कॅल्क्युलेटर

एच डी एफ सी बँकचे होम लोन कॅल्क्युलेटर वापरून तुम्ही अगदी सहज तुमचे होम लोन EMI कॅल्क्युलेट करू शकता. होम लोनकरिताचे एच डी एफ सी बँकचे EMI कॅल्क्युलेटर तुम्हाला नवीन घर खरेदी करतेवेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करते. तुमच्या होम लोनकरिता तुमचा कॅशफ्लो प्लॅनिंग करण्याकरिता EMI कॅल्क्युलेटर उपयुक्त आहे. एच डी एफ सी बँक देऊ करीत आहे होम लोन ज्याच्या EMI ची सुरुवात ₹787 प्रति लाख आणि इंटरेस्ट रेट्स सुरुवात 8.75%* p.a. आहे, तसेच फ्लेक्सिबल रिपेमेंट पर्याय आणि टॉप-अप लोन सारखे अतिरिक्त फीचर्सही मिळतील. कमी इंटरेस्ट रेट आणि दीर्घ रिपेमेंट कालावधी यासह एच डी एफ सी बँक तुम्हाला आरामदायी होम लोन EMI ची खात्री देते. आमच्या वाजवी EMIs सह एच डी एफ सी बँक होम लोन तुमच्या खिशाला परवडणारे आहे. तुमच्या होम लोन साठी तुम्हाला भरावे लागणारे EMI कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरा आमचे सहज समजणारे होम लोन EMI कॅल्क्युलेटर.

होम लोन EMI कॅल्क्युलेटर म्हणजे काय?

होम लोन EMI कॅल्क्युलेटर लोन इंस्टॉलमेंटच्या कॅल्क्युलेशनमध्ये मदत करते उदा. तुमच्या होम लोनचा EMI. हे कॅल्क्युलेटर वापरण्यास सोपे आहे आणि घर खरेदी करणार्‍या व्यक्तीसाठी फायनान्शियल प्लॅनिंग टूल म्हणून काम करते.

होम लोन EMI म्हणजे काय?

EMI म्हणजे समान मासिक हप्ता. यामध्ये मुद्दल रकमेचे रिपेमेंट आणि तुमच्या होम लोनच्या थकित रकमेवरील इंटरेस्टचे पेमेंट यांचा समावेश होतो. दीर्घ लोन कालावधी (जास्तीत जास्त 30 वर्षांसाठी) EMI कमी करण्यास मदत करते.

उदाहरण: लोनवरील EMI ची गणना कशी केली जाते?

EMI गणनेसाठी फॉर्म्युला आहे -

P x R x (1+R)^N / [(1+R)^N-1] जिथे-

पी = मुख्य लोन रक्कम

N = महिन्यांमध्ये लोन कालावधी

आर = मासिक इंटरेस्ट रेट

तुमच्या लोनवरील इंटरेस्ट रेट (R) प्रति महिना कॅल्क्युलेट केले जाते.

R = वार्षिक इंटरेस्ट/12/100

जर इंटरेस्ट रेट 7.2% p.a. असेल तर R = 7.2/12/100 = 0.006

उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने 120 महिने (10 वर्ष) कालावधीसाठी 7.2% च्या वार्षिक इंटरेस्ट रेटवर ₹10,00,000 लोन घेतल्यास त्याचा EMI खालीलप्रमाणे मोजला जाईल:

EMI= ₹10,00,000 * 0.006 * (1 + 0.006)120 / ((1 + 0.006)120 - 1) = ₹11,714.

एकूण देययोग्य रक्कम ₹11,714 * 120 = ₹14,05,703 असेल. मुख्य लोन रक्कम ₹10,00,000 आहे आणि इंटरेस्ट रक्कम ₹4,05,703 असेल

फॉर्म्युला वापरून मॅन्युअली EMI कॅल्क्युलेट करणे कंटाळवाणे असू शकते.

एच डी एफ सी बँकचे EMI कॅल्क्युलेटर तुम्हाला सहजपणे तुमचे लोन EMI कॅल्क्युलेट करण्यास मदत करू शकते.

घर खरेदीचे प्लॅनिंग करण्यात EMI गणना कशी मदत करते?

एच डी एफ सी बँकचे होम लोन EMI कॅल्क्युलेटर EMI साठी भरावयाच्या रकमेची स्पष्ट माहिती देते आणि दर महिन्याला हाऊसिंग लोन साठी आऊटफ्लो विषयी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करते. यामुळे घेतलेल्या लोन रकमेचा अंदाज घेण्यास मदत होते आणि स्वत:च्या योगदानाच्या आवश्यकता आणि प्रॉपर्टीच्या किंमतीचे मूल्यांकन करण्यास मदत होते. त्यामुळे होम लोन पात्रतेचे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आणि तुमच्या घर खरेदीच्या प्रवासाचे उत्तम प्लॅनिंग करण्यासाठी EMI जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

एच डी एफ सी बँक होम लोनची मुख्य वैशिष्ट्ये आणि लाभ काय आहेत?

  • मंजूर प्रोजेक्टमध्ये खासगी डेव्हलपर्सकडून फ्लॅट, रो हाउस, बंगला खरेदीसाठी होम लोन
  • DDA, MHADA इत्यादी डेव्हलपमेंट ऑथोरिटी कडून प्रॉपर्टी खरेदीसाठी होम लोन
  • सध्याच्या को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी किंवा अपार्टमेंट मालकांच्या संघटना किंवा डेव्हलपमेंट ऑथोरिटीच्या किंवा खासगीरित्या बांधल्या गेलेल्या घरांमध्ये प्रॉपर्टी खरेदीसाठी लोन
  • फ्रीहोल्ड / लीज होल्ड प्लॉट किंवा डेव्हलपमेंट ऑथोरिटी द्वारे वाटप केलेल्या प्लॉटवरील बांधकामासाठी लोन
  • योग्य घर खरेदी निर्णय घेण्यात तुमची मदत करण्यासाठी तज्ज्ञ कायदेशीर आणि तांत्रिक सल्लामसलत
  • भारतात कोठेही होम लोन मिळविण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी एकीकृत शाखांचे नेटवर्क
  • भारतीय लष्करात कार्यरत असलेल्यांसाठी होम लोनसाठी AGIF सह विशेष व्यवस्था.
     

आमचे खास होम लोन सर्व वयोगट आणि रोजगार श्रेणीच्या कस्टमरसाठी आहेत. आम्ही ॲडजस्टेबल रेट पर्याय अंतर्गत, टेलिस्कोपिक रिपेमेंट पर्याय असलेले 30 वर्षांपर्यंतचे दीर्घ कालावधीचे लोन देतो, जे तरुण कस्टमरचे आयुष्यात लवकरात लवकर स्वतःच्या घराचे मालक बनण्याचे स्वप्न पूर्ण करते.

सुमारे 4 दशकांहून अधिक काळासाठी होम फायनान्स पुरविण्याच्या आमच्या प्रबळ अनुभवाच्या जोरावर आम्ही आमच्या कस्टमरच्या विविध गरजा आणि स्वतःचे घर असावे हे स्वप्न पूर्ण व्हावे हे समजण्यास सक्षम आहोत .

एच डी एफ सी बँकचे होम लोन EMI कॅल्क्युलेटर कसे वापरावे?

EMI काढण्यासाठी तुम्हाला केवळ खालील तपशील एन्टर करायचा आहे:

  • लोन रक्कम: तुम्हाला हवी असलेली इच्छित लोन रक्कम एन्टर करा
  • लोन कालावधी (वर्षांमध्ये): इच्छित लोन कालावधी एन्टर करा, ज्यासाठी तुम्हाला हाऊसिंग लोन हवे आहे. दीर्घ कालावधीमुळे पात्रता वाढवण्यासाठी मदत होते
  • इंटरेस्ट रेट (% p.a.): इंटरेस्ट रेट एन्टर करा.
     

प्रचलित होम लोन इंटरेस्ट रेट्स जाणून घेण्यासाठी 'येथे क्लिक करा'

होम लोन अमॉर्टायझेशन शेड्यूल म्हणजे काय?

लोन अमॉर्टायझेशन ही लोन कालावधीसाठी नियमित पेमेंट्स सह लोन कमी करण्याची प्रोसेस आहे. होम लोन अमॉर्टायझेशन शेड्यूल हा रिपेमेंट रक्कम, मुख्य आणि इंटरेस्ट घटकांचा तपशील देणारा टेबल आहे.

एच डी एफ सी बँकचे EMI कॅल्क्युलेटर लोन कालावधी आणि इंटरेस्ट रेट्स वर आधारित मुख्य रक्कम ते देय इंटरेस्ट यांच्या रेशिओविषयी उत्तम माहिती प्रदान करते. EMI कॅल्क्युलेटर रिपेमेंट शेड्यूल स्पष्ट करणारा अमॉर्टायझेशन टेबल देखील प्रदान करते. एच डी एफ सी बँकचे होम लोन कॅल्क्युलेटर इंटरेस्ट आणि मुख्य रकमेचा संपूर्ण तपशील प्रदान करते.

एच डी एफ सी बँक होम लोन पात्रता वाढविण्यासाठी विविध रिपेमेंट प्लॅन्स ऑफर करते:

एच डी एफ सी बँक विविध गरजा पूर्ण करण्यासाठी होम लोन पात्रता अधिक करण्यासाठी विविध रिपेमेंट प्लॅन्स ऑफर करते.

  • स्टेप-अप रिपेमेंट फॅसिलिटी (SURF)

SURF एक पर्याय ऑफर करते जिथे रिपेमेंट शेड्यूल तुमच्या अपेक्षित उत्पन्न वाढीशी जोडलेले असते. प्रारंभिक वर्षांमध्ये तुम्ही अधिक लोनचा लाभ घेऊ शकता आणि कमी EMI भरू शकता. त्यानंतर, तुमच्या उत्पन्नातील गृहीत वाढी सह रिपेमेंट वाढत जाते.

  • फ्लेक्सिबल लोन इंस्टॉलमेंट्स प्लॅन (FLIP)

FLIP तुमच्या रिपेमेंट क्षमतेस अनुरुप एक कस्टमाईज्ड उपाय ऑफर करते जो लोनच्या मुदतीत बदलू शकतो. लोनची रचना अशा प्रकारे केली जाते की सुरुवातीच्या काळामध्ये EMI जास्त असते आणि नंतर उत्पन्नाच्या प्रमाणात ते घटते.

  • ट्रांच आधारित EMI

जर तुम्ही निर्माणाधीन प्रॉपर्टी खरेदी केल्यास तुम्हाला सामान्यतः लोनच्या अंतिम डिस्बर्समेंट पर्यंत काढलेल्या लोनच्या रकमेवर आधी इंटरेस्ट सर्व्हिस करावा लागतो आणि त्यानंतर EMI भरावे लागते. पण जर तुम्हाला मुख्य रकमेचे रिपेमेंट पण आधी करायचे असेल तर तुम्ही लोन रक्कम निवडण्याचा पर्याय घेऊ शकता आणि वितरित होणाऱ्या जमा झालेल्या रकमेवर EMI भरणे सुरू करू शकता.

  • ॲक्सिलरेटेड रिपेमेंट स्कीम

हा पर्याय तुम्हाला तुमच्या उत्पन्नातील वाढीच्या प्रमाणात दरवर्षी EMI वाढवण्याची सुविधा प्रदान करतो ज्यामुळे तुम्हाला लोन रिपेमेंट जलद करता येते.

  • टेलिस्कोपिक रिपेमेंट पर्याय

या पर्यायासह तुम्हाला 30 वर्षांपर्यंतचा दीर्घ रिपेमेंट कालावधी मिळतो. याचाच अर्थ वाढलेली लोन रक्कम पात्रता आणि कमी EMIs.

आमच्या वैशिष्ट्यपूर्ण EMI कॅल्क्युलेटरचा वापर करून तुमच्या हाऊसिंग लोनच्या EMI चा अंदाज घ्या!

कॅल्क्युलेटर वापरून EMI चा अंदाज घेतल्यानंतर, तुम्ही एच डी एफ सी बँक द्वारे ऑनलाईन होम लोन सह सहजपणे तुमच्या घरातून आरामात होम लोनसाठी अप्लाय करू शकता.

प्री-ॲप्रूव्ह्ड होम लोन म्हणजे काय?

एच डी एफ सी बँक तुम्हाला तुमचे स्वप्नातील घर ओळखण्यापूर्वीच प्री-ॲप्रूव्ह्ड होम लोनची सुविधा प्रदान करते प्री-ॲप्रूव्ह्ड होम लोन तुमचे उत्पन्न, पत व फायनान्शियल स्थितीच्या आधारावर दिलेल्या लोनसाठी इन-प्रिन्सिपल मंजुरी आहे.

एच डी एफ सी बँकसह होम लोनसाठी ऑनलाईन अप्लाय करा, क्लिक करा ऑनलाईन अप्लाय करा

जर तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर कृपया तुमचा तपशील आमच्यासोबत शेअर करा.

येथे क्लिक करा होम लोन विषयी अधिक जाणून घेण्यासाठी.
 

होम लोन अमॉर्टायझेशन शेड्यूल

होम लोन FAQs

EMI म्हणजे 'समान मासिक हप्ता', अशी रक्कम जी लोनची पूर्ण परतफेड होईपर्यंत प्रत्येक महिन्याच्या विशिष्ट तारखेला तुमच्याद्वारे आम्हाला दिली जाईल. EMI मध्ये मूलभूत आणि इंटरेस्ट घटकांचा समावेश आहे, जो अशा प्रकारे संरचित केला जातो की तुमच्या लोनच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये इंटरेस्ट मुख्य घटकापेक्षा बराच जास्त असतो आणि लोनच्या उत्तरार्धाच्या तुलनेत मुख्य घटक जास्त असतो.

लोन डिस्बर्समेंट झालेल्या महिन्यानंतरच्या महिन्यापासून EMI सुरू होते. अंडर-कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी लोनसाठी EMI सामान्यपणे संपूर्ण होम लोन डिस्बर्समेंट झाल्यानंतर सुरू होते परंतु कस्टमर त्यांचे पहिले डिस्बर्समेंट मिळाल्यानंतर त्यांचे EMI सुरू करू शकतात आणि प्रत्येक नंतरच्या डिस्बर्समेंटच्या प्रमाणात त्यांचे EMI वाढेल. रि-सेल प्रकरणांसाठी, संपूर्ण लोन रक्कम एकाच वेळी वितरित केल्याने, संपूर्ण लोन रकमेवर EMI डिस्बर्समेंटच्या महिन्यानंतर सुरू होते

होम लोनसाठी EMI कॅल्क्युलेटरचे लाभ खालीलप्रमाणे आहेत-

तुमचे फायनान्स ॲडव्हान्स मध्ये प्लॅनिंग करण्यास मदत करते

तुमचे कॅश फ्लो आगाऊ प्लॅन करण्यासाठी EMI कॅल्क्युलेटर उपयुक्त आहे, जेणेकरून तुम्ही होम लोन घेताना तुमचे होम लोन पेमेंट सुलभ कराल. इतर शब्दांमध्ये, EMI कॅल्क्युलेटर तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग आणि लोन सर्व्हिसिंग गरजांसाठी एक उपयुक्त साधन आहे.

 

वापरण्यास सोपे


EMI कॅल्क्युलेटर वापरण्यास अतिशय सोपे आणि सहज आहेत. तुम्हाला केवळ तीन इनपुट मूल्ये प्रदान करणे आवश्यक आहे:

 

a. लोन रक्कम
b. इंटरेस्ट रेट
c. कालावधी

 

या तीन इनपुट मूल्यांच्या आधारे, EMI कॅल्क्युलेटर प्रत्येक महिन्याला होम लोन प्रदात्याला तुम्हाला देय करण्यासाठी आवश्यक हप्त्याची गणना करेल. होम लोनसाठी काही EMI कॅल्क्युलेटर संपूर्ण लोन कालावधीमध्ये तुम्ही भरत असलेल्या इंटरेस्ट आणि मुख्य रकमेचे तपशीलवार विवरण प्रदान करतात.

प्रॉपर्टी शोधावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते

EMI कॅल्क्युलेटर तुम्हाला लोन EMI आणि तुमच्या फायनान्शियल स्थितीसाठी सर्वात योग्य कालावधी ठरविण्यात मदत करून तुमच्या मासिक बजेटसाठी सर्वोत्तम असेल अशा योग्य होम लोन रक्कम प्राप्त करण्यास मदत करते. हे तुमच्या प्रॉपर्टीच्या शोधावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास मदत करते.

सहजपणे प्रवेशयोग्य

ऑनलाईन EMI कॅल्क्युलेटर कुठेही सहजपणे ऑनलाईन ॲक्सेस करण्यायोग्य आहे. तुम्ही योग्य होम लोन रक्कम, EMI आणि तुमच्या गरजांनुसार सर्वोत्तम कालावधी गाठण्यासाठी आवश्यक तेवढ्या वेळा इनपुट व्हेरिएबलच्या विविध कॉम्बिनेशन्सचा प्रयत्न करू शकता.

 

तुम्ही मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, पुणे, जयपूर आणि अन्य सारख्या मोठ्या शहरांमध्ये होम लोन प्राप्त करू शकता आणि स्वप्नातले घर साकारू शकता.

प्री-EMI हा तुमच्या होम लोनवरील इंटरेस्टचे मासिक पेमेंट आहे. लोनचे पूर्ण डिस्बर्समेंट होईपर्यंत ही रक्कम कालावधीदरम्यान भरली जाते. तुमचा वास्तविक लोन कालावधी - आणि EMI (मुख्य आणि इंटरेस्ट दोन्ही समाविष्ट) पेमेंट प्री-EMI फेज संपल्यानंतर म्हणजेच हाऊस लोन पूर्णपणे डिस्बर्समेंट झाल्यानंतर सुरू होतो.

होय.. तुम्ही तुमच्या नजीकच्या एच डी एफ सी बँक शाखेला भेट देऊन हे करू शकता.

होम लोनची परतफेड सामान्यत: समान मासिक हप्ते (EMI) द्वारे केली जाते. EMI मध्ये मुख्य आणि इंटरेस्ट घटकांचा समावेश असतो, जो अशा प्रकारे संरचित केला जातो की तुमच्या लोनच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये इंटरेस्टचा घटक मुख्य घटकापेक्षा बराच जास्त असतो आणि लोनच्या उत्तरार्धाच्या तुलनेत मुख्य घटक जास्त असतो.

तुमच्या सोयीसाठी, एच डी एफ सी बँक होम लोन रिपेमेंट करण्यासाठी विविध पद्धती ऑफर करते. तुम्ही भारतामध्ये तुमच्या नॉन-रेसिडेन्ट (एक्स्टर्नल) अकाउंट/नॉन-रेसिडेन्ट (ऑर्डिनरी) अकाउंटमधून ECS (इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीम) मार्फत हप्ते पे करण्यासाठी तुमच्या बँकरला पोस्ट-डेटेड चेक किंवा स्थायी निर्देश जारी करू शकता. कॅश पेमेंट्स स्वीकारले जाणार नाहीत.

 

उशीरा केलेल्या पेमेंटकरिता दंड आणि चेक बाऊन्स शुल्क यासंबंधीच्या तपशिलाकरिता कृपया आमच्या विशिष्ट प्रॉडक्ट पेजवरील माहितीचा संदर्भ घ्या

होम लोन्स हे डेव्हलपरकडून निर्माणाधीन असलेली किंवा तयार असलेली प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी, रिसेल प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी, जमिनीच्या प्लॉटवर हाऊसिंग युनिट बांधण्यासाठी, आधीच अस्तित्वात असलेल्या घरामध्ये सुधारणा आणि विस्तार करण्यासाठी आणि तुमचे विद्यमान होम लोन फायनान्शियल संस्थेकडून एच डी एफ सी बँकेकडे ट्रान्सफर करण्यासाठी घेतले जातात. जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा होम लोन म्हणजे काय

एच डी एफ सी बँक होम लोन ऑनलाईन अप्लाय करण्याची सुविधा, जलद यासारखे अनेक लाभ प्रदान करते लोन प्रोसेसिंग, आकर्षक इंटरेस्ट रेट्स, कस्टमाईज्ड रिपेमेंट पर्याय आणि सोपे आणि त्रासमुक्त डॉक्युमेंटेशन.

तुम्हाला लोन रकमेवर अवलंबून एकूण प्रॉपर्टी किंमतीच्या 10-25% 'स्वत:चे योगदान' म्हणून देय करणे आवश्यक आहे. प्रॉपर्टी खर्चापैकी 75 ते 90% हाऊसिंग लोन म्हणून घेतले जाऊ शकते. कन्स्ट्रक्शन/होम इम्प्रूव्हमेंट/होम एक्सटेंशन लोन्सच्या बाबतीत, बांधकाम/सुधारणा/विस्तार अंदाजाच्या 75 ते 90% निधीपुरवठा केला जाऊ शकतो.

तुम्ही 4 जलद आणि सोप्या स्टेप्समध्ये एच डी एफ सी बँक होम लोन ऑनलाईन प्राप्त करू शकता:
1. साईन-अप / रजिस्टर करा
2. होम लोन ॲप्लिकेशन फॉर्म भरा
3. डॉक्युमेंट अपलोड करा
4. प्रोसेसिंग फी भरा
5. लोन मंजुरी मिळवा

तुम्ही होम लोनसाठी ऑनलाईनही अप्लाय करू शकता. आता अप्लाय करण्यासाठी https://portal.hdfc.com/ ला भेट द्या!.

एच डी एफ सी बँक मुख्यत्वे तुमच्या उत्पन्न आणि रिपेमेंट क्षमतेद्वारे तुमची होम लोन पात्रता निर्धारित करेल. इतर महत्त्वाच्या घटकांमध्ये तुमचे वय, पात्रता, अवलंबून असलेल्यांची संख्या, तुमच्या पती/पत्नीचे उत्पन्न (जर असल्यास), मालमत्ता आणि दायित्व, सेव्हिंग्स रेकॉर्ड आणि व्यवसायाची स्थिरता आणि सातत्य यांचा समावेश होतो.

तुम्ही प्री-ॲप्रूव्ह्ड होम लोनसाठी अप्लाय करू शकता जे तुमचे उत्पन्न, पत व फायनान्शियल स्थितीवर आधारित लोन साठी इन-प्रिन्सिपल मंजुरी आहे. सामान्यपणे, प्रॉपर्टी निवडण्यापूर्वी प्री-ॲप्रूव्ह्ड लोन घेतले जातात आणि लोन मंजुरीच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या कालावधीसाठी वैध असतात.

निर्माणाधीन असलेल्या प्रॉपर्टी करता बांधकामाच्या प्रगतीच्या आधारावर एच डी एफ सी बँक लोन चे वाटप हप्त्यांमध्ये करते. वितरित केलेला प्रत्येक हप्ता 'आंशिक' किंवा 'त्यानंतरचे' डिस्बर्समेंट म्हणून ओळखले जाते.

खालील प्रकारचे होम लोन्स प्रॉडक्ट्स सामान्यपणे हाऊसिंग फायनान्स संस्था द्वारे भारतात ऑफर केले जातात:

 

होम लोन्स

हे लोन यासाठी घेतले जातात:
 

1 मंजूर प्रोजेक्टमध्ये खासगी डेव्हलपर्सकडून फ्लॅट, रो हाउस, बंगल्याची खरेदी;

2.डीडीए, म्हाडा तसेच विद्यमान सहकारी हाऊसिंग संस्था, अपार्टमेंट मालकांचे असोसिएशन किंवा विकास प्राधिकरणांच्या वसाहती किंवा खासगीरित्या बांधकाम केलेली घरे अशा प्रॉपर्टी खरेदीसाठी होम लोन्स;

3.फ्रीहोल्ड / लीज होल्ड प्लॉट किंवा विकास प्राधिकरणाने आवंटित केलेल्या प्लॉटवर बांधकाम लोन


प्लॉट खरेदी लोन

प्लॉट खरेदी लोन थेट वाटप किंवा दुसऱ्या विक्री व्यवहाराद्वारे तसेच दुसऱ्या बँक/फायनान्शियल संस्थेकडून घेतलेले तुमचे विद्यमान प्लॉट खरेदी लोन ट्रान्सफर करण्यासाठी घेतले जाते.


बॅलन्स ट्रान्सफर लोन

अन्य बँक / फायनान्शियल संस्थेकडून घेतलेले तुमचे थकित होम लोन एच डी एफ सी बँककडे ट्रान्सफर करणे याला बॅलन्स ट्रान्सफर लोन म्हणतात.


हाऊस रिनोव्हेशन लोन्स

हाऊस रिनोव्हेशन लोन टायलिंग, फ्लोअरिंग, अंतर्गत / बाह्य प्लास्टर आणि पेंटिंग इ. सारख्या अनेक मार्गांनी तुमच्या घराचे रिनोव्हेशन (स्ट्रक्चर / कार्पेट एरिया बदलल्याशिवाय) करण्यासाठी लोन आहे.


होम एक्सटेंशन लोन

अतिरिक्त रुम आणि फ्लोअर इ. बाबींसह तुमचे घर विस्तारित करण्यासाठी किंवा राहण्याची जागा वाढविण्यासाठी हे लोन उपयोगी आहे.

विविध शहरांमध्ये होम लोन

कृपया आमच्या लोन एक्स्पर्ट कडून कॉल मिळवण्यासाठी तुमचे तपशील शेअर करा!

Thank you!

धन्यवाद!

आमचे लोन एक्स्पर्ट लवकरच तुम्हाला कॉल करतील!

ओके

काहीतरी चुकीचे घडले आहे!

कृपया पुन्हा एन्टर करा

ओके

काय मग, होम लोन घ्यायचा विचार करताय का?

फक्त एक मिस्ड कॉल द्या या क्रमांकावर

Phone icon

+91-9289200017

जलद पेमेंट करा

लोन कालावधी

15 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

अधिक लोकप्रिय

लोन कालावधी

20 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

आरामात

लोन कालावधी

30 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

800 आणि त्यावरील क्रेडिट स्कोअरसाठी*

* हे रेट आजनुसार आहेत,

तुमच्यासाठी काय योग्य आहे याबाबत साशंक आहात का?

Banner
"एच डी एफ सी हाऊसिंग फायनान्सची त्वरित सेवा आणि समजूतदारपणाचे कौतुक करा"
- अविनाशकुमार राजपुरोहित, मुंबई

तुमचे तपशील शेअर केल्याबद्दल धन्यवाद

198341
198341
198341
198341
अमॉर्टिझेशन शेड्यूल पाहा

EMI ब्रेक-डाउन चार्ट

EMI सुरुवात ₹ 787/* - प्रति लाख

+91 9289200017
नवीन होम लोनसाठी